| विभागांतर्गत संस्था/ महामंडळे |
|
|
|
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ महामंडळाविषयी स्थापना-दि. १ मे १९७४ राज्यातील चार्मोद्योगाचा विकास, कारागीर व तंत्रज्ञान विकसित करणे, बाजारपेठेची निर्मिती, प्रोत्साहन देणे , त्यांना विकासासाठी चालना देणे याकरिता या महामंडळाची स्थापना करण्यात आली. योजना१. बीज भांडवल योजना २. मुदती कर्ज सहायता योजना (केंद्र पुरस्कृत योजना) ३. महिला समृध्दी योजना. (केंद्र पुरस्कृत योजना) ४. ५०% अनुदान योजना संपर्क ४५ वीर, नरीमन मार्ग, बॉम्बे लाईफ बिल्डींग, ५ वा मजला, मुंबई १. दूरध्वनी: ०२२ २२०४७१५७ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ महामंडळाविषयी स्थापना- दि. १० जुलै १९७८ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील कुटुंबांची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याच्या मुख्य उद्देश्याने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना केली आहे. संपर्क सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर, क्रॉस मार्ग, क्र. ९ जे, व्ह.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई ४९. दूरध्वनी- ०२२ २२६१७६४१ योजना १. थेट कर्ज योजना २. बीज भांडवल योजना ३. सफाई कामगार पुनर्वसन योजना (केंद्र पुरस्कृत योजना) ४. मुदती कर्ज योजना (केंद्र पुरस्कृत योजना) ५. अस्वच्छ सफाई कामगारांच्या कुटुंबियांसाठी पुनर्वसन योजना ६. सुक्ष्म पतपुरवठा योजना (केंद्र पुरस्कृत योजना) ७. शैक्षणिक कर्ज योजना (केंद्र पुरस्कृत योजना) ८. ५०% अनुदान योजना (केंद्र पुरस्कृत योजना) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महामंडळाविषयी स्थापना- दि. ११ जुलै १९८५ महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखालील असणाऱ्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देश्याने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या १० पोट जातीतील लोकांना या महामंडळातर्फे लाभ देण्यात येतो. संपर्क २२ बी, कल्याणी केंद्र, अशोकवन, हनुमान टेकडी, आराधना बिल्डींग समोर, बोरीवली (पूर्व). दूरध्वनी- ०२२ २८९७२७३ योजना १. बीज भांडवल योजना २. मुदती कर्ज योजना (केंद्र पुरस्कृत योजना ) ३. अनुदान योजना |




सर्व अधिका-यांचे ई-मेल आयडी





