सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
शासन निर्णय
शासन निर्णय क्रमांक इसीबी १०७७/ २६२५४/ डेस्क -५, दिनांक १ ऑगस्ट १९७८
शासन निर्णय क्रमांक इसीबी -२००३/ प्र क्र १८४ / मावक-२, दिनांक १७-०९-२००३
उद्देश
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भारती होण्याचे विद्यार्थी दशेत त्यांना आकर्षण निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
अटी व शर्ती
विद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा.
विद्यार्थी इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गात शिकणारा असावा.
त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.६५२९०/- पेक्षा जास्त नसावे.
लाभाचे स्वरूप
सातारा, नाशिक, पुणे येथील सैनिकी शाळेत प्रवेशित विद्यर्थ्यांना संपूर्ण शिक्षण फी, परिक्षा फी, भोजन, निवास, कपडालत्ता, घोडसवारी, पॉकेटमनी इत्यादीवर होणा-या पूर्ण खर्चाची प्रतिवर्षी शासनामार्फत करण्यात येते.
१९९६-९७ पासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत प्रति विद्यार्थी रु. १५०००/- प्रतिवर्ष
संपर्क
संबंधित जिल्ह्याचे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी