स्क्रीन रीडर एक्सेस
English
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क

शिक्षण आणि संशोधन Print E-mail
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

Dr. Ambedkar Research and Training Institute, Pune

Web Site: www.ambedkaracademy.ac.in

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठ स्थापना दि. २९ डिसेंबर १९७८ रोजी मुंबई येथे करण्यात आली या विचारपीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था असे करण्यात आले. ही संस्था मुंबई येथून सन १९८७ मध्ये पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आली. संस्थेस दि. १७ ऑक्टोबर २००८ रोजी शासनाकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा प्रदान करण्यात आला, संस्थे मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, लोक प्रतिनिधी यांचे प्रशिक्षण, योजनांचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन, संशोधन विविध स्पर्धा परीक्षाचे प्रशिक्षण, हॉर्टीकल्चर प्रशिक्षण इत्यादी.

Dr. Ambedkar Research and Training Institute, Pune

अनुसूचित जातीच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यवसायाभिमुख क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण
शासन निर्णय क्रमांक: इबीसी - २००६/ प्र.क्र. १४८/ मावक-२ दि. १५ सप्टेंबर २००६

अनुसूचित जातीमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी करून त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यांना कृषिऔद्यागिक, कृषि प्रक्रिया, फळ बागा, फुल शेती, रेशीम उद्योग, कृषि पणन, मत्स्य व्यवसाय, पशु संवर्धन, दुग्ध प्रक्रिया या विषयांवर प्रशिक्षण देऊन, त्याचे कौशल्य व क्षमतावृद्धी करण्यात येते. कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या तर्फे तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे येथे हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर मार्फत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण कालावधी ५ दिवसाचा आहे.

अटी व शर्ती
  • प्रशिक्षणार्थी अनुसूचित जातीचा असावा.
  • शिक्षण इयत्ता ८ उत्तीर्ण असावा
  • वयोमर्यादा १८ ते ४५ वर्ष
मोफत प्रशिक्षणाबरोबरच प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्याची भोजन, निवासाची मोफत सोय करण्यात येते.

संपर्क. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८ राणीचा बाग, पुणे १.
 

मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०११ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम