| ई-शिष्यवृत्तीची मुदत आता ७ डिसेंबर २०११ पर्यंत |
|
|
|
महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १ डिसेंबर २०११ समाजकल्याण खात्याच्या ई-शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठीची मुदत आता सात डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेत शहरातील कॉलेजांना सहभागी करून घेण्यासाठीही समाजकल्याण विभागातर्फे पावले उचलण्यात येणार असल्याची माहितीही राज्याचे समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड यांनी बुधवारी दिली. ई-शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी विभागाकडे अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारपर्यंत (३० नोव्हेंबर) मुदत देण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून हे अर्ज भरण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना हे ऑनलाइन अर्ज सादर करण्यामध्ये अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांनी थेट समाजकल्याण आयुक्तांच्या कार्यालयात धाव घेत आयुक्तांसमोर आपल्या अडचणी सांगितल्या. त्या वेळी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणींवर मार्ग काढत या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून दिली आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात करत नेमक्या चुका शोधण्यासाठी 'मास्टेक' कंपनीच्या तंत्रज्ञांची बैठकही बोलावली आहे. ई-शिष्यवृत्तीची मुदत वाढविल्याविषयीची जाहिरातही विभागातफेर् लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अद्यापपर्यंत १२ लाख ९० हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले असून, त्यातील १२ लाख २२ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली. |




सर्व अधिका-यांचे ई-मेल आयडी





