| समाजकल्याण योजनांच्या पुर्नरचनेसाठी आता समिती |
|
|
|
महाराष्ट्र टाइम्स, पुणे २९ नोव्हें २०११ समाजकल्याण विभागाच्या अनेक योजना या कालबाह्य झाल्याने यांचा फारसा उपयोग होत नाही; तसेच विभागाच्या काही योजनांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने याचीपुनर्रचना करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची समिती लवकरच स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय व व्यसनमुक्तीकार्य विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सोमवारी केली. राज्यातील समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबतची आढावा बैठक सोमवारी कौन्सिल हॉल येथे मोघे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये ही घोषणाकरण्यात आली. समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त आर. के. गायकवाड, भटक्या जमातीविमुक्त जाती, विशेष मागास कल्याण विभागाचे संचालक विश्वजित माने या वेळी उपस्थित होते. अनुसूचित जाती व मागासवगीर्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी सरकारच्यावतीने कोट्यवधी रुपयांचानिधी खर्चकरण्यात येतो. विभागाच्या योजना कल्याणकारी असल्या, तरी अनेक योजना या कालबाह्य झाल्याने नागरिकांचा त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. ही बाब सरकारच्या लक्षात आल्याने त्यांची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. या साठी समाजकल्याण कार्यालयाने आपल्या पातळीवर एकसमिती नेमून त्याचा अहवाल सरकारकडे कमीत कमी वेळेत पाठवावा, अशासूचनाही मोघे यांनी या बैठकीत दिल्या. |




सर्व अधिका-यांचे ई-मेल आयडी





